Saturday, February 8, 2020

इयत्ता 12 वी राज्यशास्त्र विषयाच्या बोर्ड परीक्षा 2019- 20 साठी महत्त्वपूर्ण रिकाम्या जागा.


इयत्ता 12 वी राज्यशास्त्र विषयाच्या बोर्ड परीक्षा 2019-  20 साठी महत्त्वपूर्ण रिकाम्या जागा.  


दिलेल्या पर्यायांपैकी योग्य शब्द /संख्या निवडून विधाने पूर्ण करा :


(१) २६ जानेवारी १९५० रोजी भारत एक ------ देश बनला. (स्वतंत्र, स्वायत्त, प्रजासत्ताक, प्रगत)

(२) ------.वर्षांखालील मुला-मुलींना खाणी, कारखाने अशा धोकादायक ठिकाणी कामावर ठेवण्यास मनाई केलेली आहे.
(चौदा, बारा, अठरा, एकवीस)

(३) लोकसभेचे विसर्जन राष्ट्रपती --------सल्ल्यानुसार करतो.
(प्रधानमंत्र्यांच्या, उपराष्ट्रपतींच्या, सरन्यायाधीशांच्या, राज्यपालांच्या)

(४) सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार------- देण्यात आला आहे.
(विधानसभेला, राज्यसभेला, विधान परिषदेला, संसदेला)

(५) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाची स्थापना------- साली झाली. (१८५७, १८८५, १९४७, १९९१)

उत्तरे : (१) प्रजासत्ताक (२) चौदा (३) प्रधानमंत्र्यांच्या (४) संसदेला (५) १८८५.


(६)'धर्मनिरपेक्षता' हा शब्द------ मध्ये १९७६ मध्ये नव्याने घालण्यात आला.
(संविधान, मार्गदर्शक तत्त्व, प्रास्ताविक, गॅझेट)

(७) अटक करण्यात आलेल्या व्यक्तीस-------- तासांच्या आत न्यायालयामध्ये हजर करावे लागते.
(४८, २४, १२, ३६)

(८) संसदेत मंजूर झालेल्या  विधेयकावर--------
सही झाल्यानंतर त्याचे कायदयात रूपांतर होते.
(राज्यपालांची, राष्ट्रपतींची, न्यायाधीशांची, प्रधानमंत्र्यांची)

(९)--------- हे एकपक्ष पद्धतीचे उदाहरण आहे.
(चीन, भारत, अमेरिका, ओमान)

(१०)---------- शहराबाबत पंजाब व हरियाणा या दोन राज्यांत विवाद होता.
(मुंबई, चंडीगढ़, म्हैसूर, अमृतसर)

उत्तरे : (६) प्रास्ताविक (७) २४ (८) राष्ट्रपतींची (९) चीन (१०) चंडीगढ,


(११) १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत------- झाला. (स्वतंत्र, स्वायत्त, प्रजासत्ताक, प्रगत)

(१२) 'धर्मनिरपेक्षता' हे तत्त्व भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये सन -------- मधे नव्याने समाविष्ट करण्यात आले.
(१९७६, १९८०, १९४९, १९५२)

(१३) .......... वषाखालील मुलांना खाणी, कारखाने किंवा अन्य धोक्याच्या ठिकाणी कामावर ठेवण्यास मनाइ आहे.
(१८, १२, २१, १४)

(१४) मंडल आयोगाने --------- च्या आरक्षणाची शिफारस केली होती.
(अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास वर्ग, भटक्या जमाती)

(१५) संसदेमध्ये आर्थिक विधेयक प्रथम.......मांडतात. (राज्यसभेत, लोकसभेत, विधान परिषदेत, विधानसभेत)

उत्तरे : (११) स्वतंत्र (१२) १९७६ (१३) १४ (१४) इतर मागास वर्ग (१५) लोकसभेत.

(१६) भारतीय घटना समितीचे (संविधान परिषदेचे) अध्यक्ष------ होते.
(पंडित नेहरू, डॉ. राजेंद्र प्रसाद, डॉ. आंबेडकर, सरदार पटेल)

(१७)--------- वर्षांखालील मुला-मुलींना खाणी, कारखाने किंवा इतर धोकादायक ठिकाणी कामावर ठेवण्यास .
(१२, १४, १६, १८)

(१८) उपराष्ट्रपती हे --------- पदसिद्ध अध्यक्ष असतात. (लोकसभेचे, विधानसभेचे, विधान परिषदेचे, राज्यसभेचे)

(१९) --------- हा केंद्रीय मंत्रिमंडळाचा नेता असतो. (राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री, लोकसभेचा सभापती)

(२०) भारतात सध्या -------- पद्धती आहे. (एकपक्ष, द्विपक्ष, बहुपक्ष, एक प्रबळ पक्ष)

उत्तरे : (१६) डॉ. राजेंद्र प्रसाद (१७) १४ (१८) राज्यसभेचे (१९) प्रधानमंत्री (२०) बहुपक्ष.



(२१)खलिस्तानची मागणी -------- राज्यात करण्यात आली. (पंजाब, तामिळनाडू, महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर) )

(२२) नर्मदा बचाव आंदोलनाबरोबर --------यांचे नाव जोडले गेले आहे.
(शरद जोशी, मेधा पाटकर, सुंदरलाल बहुगुणा, महेंद्रसिंग टिकैत)

(२३) १९८९ साली श्री.-------यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय आघाडीने सरकार स्थापन केले.
(व्ही. पी. सिंग, अटलबिहारी वाजपेयी, राजीव गांधी, पी. व्ही. नरसिंह राव)

(२४) सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांची नेमणूक --------- कडून केली जाते.
(राज्यपाल, पंतप्रधान प्रधानमंत्री, कायदामंत्री, राष्ट्रपती)

(२५)--------- यांना 'भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार' असे म्हटले जाते.
(डॉ. आंबेडकर, डॉ. राजेंद्रप्रसाद, पं. नेहरू, सरदार पटेल)

उत्तरे : (२१) पंजाब (२२) मेधा पाटकर (२३) व्ही. पी. सिंग (२४) राष्ट्रपती (२५) डॉ. आंबेडकर.


(२६) केंद्र सूचीतील विषयांवर ---------- सरकार कायदा बनवू शकते. (केंद्र, राज्य,केंद्र, राज्य, दोन्ही, प्रादेशिक)

(२७) भारतामध्ये मुख्य निवडणूक आयुक्तांना बडतर्फ करण्याचा अधिकार------ असतो. (संसदेला, राष्ट्रपतींना, पंतप्रधानांना/ प्रधानमंत्र्यांना)

(२८) १० डिसेंबर १९४८ रोजी संयुक्त राष्ट्रांनी -------
हक्कांचा जागतिक जाहीरनामा घोषित केला.
(राजकीय, आर्थिक, नैसर्गिक, मानवी )

(२९) महाराष्ट्रामध्ये शिक्षक मतदारसंघातन विधान परिषदेवर---------सदस्य निवडले जातात.
(२/३, १/६, १/३, १/१२)

(३०) राष्ट्रपती आपला राजीनामा------कडे देतात.
(पंतप्रधान / प्रधानमंत्री, उपराष्ट्रपती, सरन्यायाधीश, लोकसभा सभापती)

उत्तरे : (२६) केंद्र (२७) संसदेला (२८) मानवी (२९) १/१२ (३०) उपराष्ट्रपती.


(३१) –------ यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हटले जाते.
(डॉ. राजेंद्र प्रसाद, पं. जवाहरलाल नेहरू, डॉ. आंबेडकर, सरदार पटेल)

(३२) १० डिसेंबर १९४८ रोजी संयुक्त राष्ट्रांनी------- ..हक्कांचा जाहीरनामा घोषित केला.
(आर्थिक, राजकीय, नैसर्गिक, मानवी)

(३३) राज्यसभेवर महाराष्ट्रातून........... सदस्य पाठवले जातात. (७८, २८९, ४८, १९)

(३४) सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या निश्चित करण्याचा अधिकार -------- आहे.
(संसदेला, राज्यसभेला, विधानसभेला, विधान परिषदेला)

(३५) महाराष्ट्रात शेतकरी संघटनेचे प्रणेते------- होत.
(मेधा पाटकर, सुंदरलाल बहुगुणा, शरद जोशी, नारायण लोखंडे)

उत्तरे : (३१) डॉ. आंबेडकर (३२) मानवी (३३) १९ (३४) संसदेला (३५) शरद जोशी

8 comments:

HSC Board feb 2025 Result

   HSC Board feb 2025 Result HSC Board Exam February 2025 Result Date  05/05/2025   इयत्ता बारावी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी 2025 निकाल दिनांक...