Dr.Ram Dhage

Sunday, May 4, 2025

HSC Board feb 2025 Result

 

 HSC Board feb 2025 Result



HSC Board Exam February 2025 Result Date 
05/05/2025

 

इयत्ता बारावी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी 2025 निकाल दिनांक 05/05/2025 वार सोमवार रोजी दुपारी 1.00 नंतर जाहिर होत आहे. 

खालील लिंक  वर क्लिक करून आपला निकाल पहा.

*०५ मे २०२५, दुपारी १:००*

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE), पुणे द्वारे घेण्यात आलेल्या *HSC 2025* परीक्षेचा निकाल तपासण्यासाठी संकेतस्थळ

*HSC बोर्ड परीक्षा फेब्रुवारी 2025 निकाल 05/05/2025 रोजी दुपारी ठीक 1.00 वाजे नंतर जाहिर होत आहे* 

खालील लिंक वर क्लिक करून निकाल पाहण्यासाठीच्या लिंक मिळवा.

1). https://mahresult.nic.in/

2) https://www.sscresult.mkcl.org/

3) https://sscresult.mahahsscboard.in/


तसेच इतर सर्व माहिती पाहण्यासाठी खालील परिपत्रक वाचा.



Monday, November 25, 2024

उत्सव संविधानाचा : जागर नागरी जाणिवांचा

उत्सव संविधानाचा : जागर नागरी जाणिवांचा

प्रा. डॉ. राम ढगे.



भारतीय संविधान दिन हा 26 नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो. संविधान दिनी शासकीय कार्यालये, शाळा महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधान निर्मितीसाठी मसुदा समिती स्थापन करण्यात आली. अनेक बैठका व चर्चासत्रानंतर मसुदा समितीने सादर केलेला अंतिम मसुदा संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील संविधान सभेने स्वीकारला, तो दिवस 26 नोव्हेंबर 1949 होता. म्हणून 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय संविधान आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ भारत सरकारच्या केंद्रीय सामाजिक आणि सशक्तिकरण मंत्रालयाने 19 नोव्हेंबर 2015 रोजी संपूर्ण भारतात 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. भारत सरकारने आंबेडकरांची 125 वे जयंती वर्ष साजरे केले जात असताना त्यांना एक प्रकारची श्रद्धांजली वाहण्यासाठी 26 नोव्हेंबर 2015 रोजी पहिला अधिकृत संविधान दिन साजरा केला. भारतीय संविधान तयार करण्यासाठी संविधान सभेच्या सर्व प्रमुख समित्या आणि विशेष करून मसुदा समितीने एकूण 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस अथक परिश्रमाने भारतीय संविधान तयार केले. 26 जानेवारी 1950 रोजी स्वतंत्र भारताचे संविधान देशात लागू झाल्याने भारत देश खऱ्या अर्थाने सार्वभौम झाला, आणि संविधानाने या सार्वभौम भारताची सत्ता सामान्य नागरिकांच्या हातात दिली. म्हणून आपण 26 जानेवारी दिवस आनंदाने प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. आमचा देश सार्वभौम  झाला, प्रजासत्ताक झाला म्हणून आपण गर्व, अभिमान व्यक्त करतो. राष्ट्रीय सण साजरा करतो. ज्यांच्यामुळे हा दिवस आपण पाहत आहोत अशा स्वातंत्र्य चळवळतील नेत्यांचे कार्य आणि अथक परिश्रमाने स्वतंत्र भारतासाठी ज्यांनी स्वतंत्र संविधान तयार केले त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे 26 नोव्हेंबर, म्हणूनच या दिवशी संविधान दिन साजरा केला जातो. 

भारतीय संविधानातील तत्वे, उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी निर्माण करण्यात आलेले कायदे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचणे घटनाकरांना अपेक्षित होते. परंतु आपण आज पाहतो भारतीय संविधानाबद्दल देशातील सर्व नागरिकांमध्ये म्हणावी तेवढी जागृती झालेली दिसून येत नाही. परिणामी भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी आजही प्रभावीपणे होताना दिसून येत नाही. यासाठी भारतीय संविधान, संविधानातील तत्वे, उद्दिष्टे देशातील जनतेपर्यंत पोहोचवणे अत्यंत आवश्यक वाटते.  सध्या पाश्चिमात्य संस्कृतीच्या युगात मशगुल असलेल्या तरुण पिढीमध्ये आपल्या देशातील संविधानाची मूल्य व तत्वे रुजवणे यासाठी विविध उपक्रम शाळा, महाविद्यालय व शासकीय कार्यालयामार्फत राबवणे आवश्यक आहे. भारतीय संविधानाचा उद्देश केवळ शासन संस्था निर्माण करणे असा नव्हता तर भारतीय समाजामध्ये सामाजिक आणि आर्थिक न्याय प्रस्थापित करण्याबरोबर सर्व नागरिकांना सुरक्षितता, स्वातंत्र्य, समान संधी आणि न्याय मिळवून देणे असाही आहे. भारतीय संविधान दिनानिमित्त देशातील सर्व नागरिकांनी आपल्या हक्क आणि कर्तव्यांप्रती जागृत होण्याची ही एक संधी आहे, असे समजावे. भारतीय संविधान हा आपल्या देशातील सर्वोच्च कायदेशीर आणि ऐतिहासिक दस्तऐवज असल्याने त्याप्रति श्रद्धा, आपुलकी, अभिमान, स्वाभिमान व्यक्त करून भारताच्या राष्ट्रीय एकता, अखंडता आणि समृद्धीसाठी सर्व नागरिकांनी आपल्यातील विविधता, भेदभावाची भावना बाजूला ठेवून एकत्र यावे. नागरिकांनी राष्ट्राची अखंडता व संविधानाचे रक्षण करण्याचा आजच्या दिवशी संकल्प करून खऱ्या अर्थाने संविधान दिन साजरा करावा अशी अपेक्षा वाटते.


Monday, May 20, 2024

 


इ. १२ वीचा निकाल २१/०५/२०२४ रोजी दुपारी १:०० नंतर खालील साईटवर पहा.

1. https://hsc.mahresults.org.in/

Thursday, July 7, 2022

पाठ्यपुस्तक समिती सदस्य व चित्रकार निवड

       पाठ्यपुस्तक समिती सदस्य व चित्रकार निवड
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे .ही संस्था 1967 पासून महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांसाठी विविध भाषांमध्ये पाठ्यपुराक व पूरक साहित्य तयार करत आहे. सध्या संपूर्ण भारतात नवीन राष्ट्रीय धोरण 2020 राबवण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर पाठ्यपुस्तक मंडळाच्या विविध भाषा विषय समित्यांचे गठन करणे शासनाच्या माध्यमातून प्रस्तावित आहे यासाठी भाषा व विषय समित्यावर सदस्यांची निवड करणे तसेच आवश्यकतेनुसार पाठ्यपुस्तकातील चित्राकृती तयार करण्यासाठी चित्रकारांची निवड करण्यासाठी सदर लिंक सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
जाहिरात क्रमांक: 1029 
दिनांक 1/7/ 2022
लिंक भरण्याचा कालावधी दिनांक 4/7/2022 ते 20/7/2022 रात्री 12:00 वाजेपर्यंत

अर्ज करण्यासाठी निळ्या रंगाच्या लिंक वरती क्लिक करा.
👇👇👇👇👇👇




Sunday, March 6, 2022

बारावी बोर्ड परीक्षा 2025 साठी महत्त्वपूर्ण वस्तुनिष्ठ प्रश्न 2 .राज्यशास्त्र विषय

 बारावी बोर्ड परीक्षा 2025साठी राज्यशास्त्र विषयाचे महत्त्वपूर्ण वस्तुनिष्ठ प्रश्न दुसरा संकल्पना चित्र व नकाशा 09 गुणांसाठी उत्तरासहित👇

(निळ्या रंगाची वाक्य उत्तरे दर्शवितात.)

प्रश्न दुसरा 09 गुणांसाठी सराव



प्रश्न 2. अ) खालील संकल्पना चित्र पूर्ण करा.

 (गुण 04) 👇👇

1)  👇



उत्तर - १) सहभागात्मक २) कायद्याचे राज्य

  ३) प्रतिसादात्मक ४) परिणाम आणि कार्यक्षमता

2) 👇

 


उत्तर - १) भौगोलिक २) ऐतिहासिक

           ३) राजकीय ४) आर्थिक

3)  👇


उत्तर - 1) बांगलादेश 2) नेपाळ 3) थायलंड 4) भूतान

4) 👇



उत्तर - 1)समान नागरिकत्व 2) सामाजिक, राजकीय, आर्थिक न्याय  3) धर्मनिरपेक्षता 4) बंधुत्व जोपासणे

5) 👇



उत्तर - 1) लोकपाल आणि लोकायुक्त 2) नागरीकांचा प्रशासनातील सहभाग.

प्रश्न 2 ब) खालील नकाशाचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.👇👇  (गुण 05) 

1)  👇

१) युरोपियन युनियनमधील युरोझोनचे सदस्य असलेल्या दोन राष्ट्रांची नावे लिहा.    (२)                                   

२) युरोपियन युनियनमधील युरोझोनचे सदस्य नसलेल्या दोन राष्ट्रांची नावे लिहा.      (२)                                 

३) फ्रान्स राष्ट्र शेजारील कोणत्याही एका राष्ट्राचे नाव लिहा.(१)      




उत्तर - १) स्पेन, फ्रान्स, जर्मनी, इटली, फिनलंड, ऑस्ट्रिया, स्वालवेनिया
२) स्वीडन, पोलंड, रूमनिया,हंगेरी, चेक प्रजासत्ताक
३) स्पेन, जर्मनी, इटली


2) 👇

१) शेंगेन आणि युरोपियन युनियनचे सदस्य असलेल्या दोन देशांची नावे लिहा. (२)                                         

२) युरोपियन युनियनचे सदस्य नसलेले परंतु शेंगेनचे सदस्य असलेल्या दोन देशांची नावे लिहा. (२)                

३) शेंगेनचे सदस्य नसलेले परंतु युरोपियन युनियनचे सदस्य असलेल्या एका देशाचे नाव लिहा. (१)



उत्तर - १) स्पेन,फ्रान्स  

         २) नॉर्वे, रुमानिया

          ३) बेलारूस, युक्रेन

3) 👇

१) हिंदी महासागराच्या किनाऱ्यालगत असणाऱ्या दोन देशांची नावे लिहा. (२)                                             

२) भारताच्या शेजारील परंतु हिंदी महासागराच्या किनाऱ्यालगत असणाऱ्या दोन देशांची नावे लिहा. (२)

३) भारताच्या शेजारील परंतु हिंदी महासागराच्या किनाऱ्यालगत नसणाऱ्या कोणत्याही एका देशाचे नावे लिहा. (१)     



उत्तर - 1) मालदीव, इंडोनेशिया    

            2) श्रीलंका, म्यानमार

            3) पाकिस्तान

4) 👇

1) जगाच्या नकाशातील भारताच्या सीमेलगतच्या दोन देशांची नावे लिहा. (२)
2) जगाच्या नकाशात सार्क सदस्य असलेल्या दोन  देशांची नावे लिहा.(२)
3) जगाच्या नकाशातील कोणत्याही एका महासागराचे नाव लिहा. (१)


उत्तर -

1) चीन, पाकिस्तान, बांगलादेश, थायलंड
2) भारत, बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, श्रीलंका, मालदीव
3) पॅसिफिक महासागर, अटलांटिक महासागर, हिंदी महासागर

5) 👇

1) दिलेल्या नकाशाचे निरीक्षण करून नकाशात असणाऱ्या दोन समुद्रांची नावे लिहा.
2) इराक बरोबर सीमारेषा असलेल्या कोणत्याही दोन देशांची नावे लिहा.
3) कुवेत आणि इराक या नकाशात कोणते आखात आहे.


उत्तर - 
1) भूमध्य समुद्र, काळा समुद्र
2) सौदी अरेबिया, कुवेत, इराण,अर्मेनिया, सीरिया, जॉर्डन
3) ओमानचे आखात

6)  👇

1) युरोप या  नकाशातील कोणत्याही दोन देशांची नावे लिहा.
2) युरोप या नकाशातील कोणत्याही दोन समुद्रांची नावे लिहा.
3) युरोप या नकाशात कोणता उपसागर आहे.



उत्तर - 
1) फ्रान्स, जर्मनी 
2) भूमध्य समुद्र, नॉर्वेचा समुद्र
3) बिस्केचा उपसागर

समाप्त.....✌✌✌










बारावी बोर्ड परीक्षा 2025 साठी महत्त्वपूर्ण वस्तुनिष्ठ प्रश्न 3 राज्यशास्त्र विषय

 

बारावी बोर्ड परीक्षा 2025साठी राज्यशास्त्र विषयाचे महत्त्वपूर्ण वस्तुनिष्ठ प्रश्न तिसरा चूक की बरोबर 10 गुणांसाठी उत्तरासहित👇

(निळ्या रंगाची वाक्य उत्तरे दर्शवितात.)

प्रश्न तिसरा 10 गुणांसाठी सराव


प्रश्न ३.) खालील विधाने चूक की बरोबर ते सकारण लिहा. (कोणतेही पाच) (१०)                          

१) सूशासनामध्ये नैसर्गिक संसाधनांचा कुशलतेने वापर केला जातो.

उत्तर - हे विधान बरोबर आहे.

कारण, सुशासन आत समाविष्ट परिणामकारकता आणि कार्यक्षमता यात नैसर्गिक साधनसंपत्तीचा समावेश होतो.

२) समाज परिवर्तनासाठी लोकशाही आवश्यक आहे.

उत्तर - हे विधान बरोबर आहे.

कारण, सामाजिक बदल, लोकशाही व्यवस्था आणि आर्थिक प्रगती साध्य करण्यासाठी लोकशाही आवश्यक आहे.

३) नियोजन आयोगाची निर्मिती कृषी विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी झाली.

उत्तर - हे विधान चूक आहे.

कारण, नियोजन आयोगाची निर्मिती सर्वच क्षेत्रांच्या विकासासाठी केलेली आहे.

४) जागतिकीकरणाने बाजारपेठीय अर्थव्यवस्था ही संकल्पना आणली.

उत्तर - हे विधान बरोबर आहे.

कारण, जागतिकीकरणामुळे सर्व जग एक बाजारपेठ बनली आहे.

५) दक्षिण आशियातील व्यापारासाठी सार्क महत्त्वाचे आहे.

उत्तर - हे विधान बरोबर आहे.

कारण, दक्षिण आशियाई मुक्त व्यापार व्यवस्था करार २००६ पासून कार्यान्वित आहे.

६) शहरातील मॉल्सच्या स्पर्धेत छोट्या दुकानदारांचा टिकाव लागत नाही.

उत्तर - हे विधान बरोबर आहे.

कारण, शहरातील मॉल्स त्यांच्या ग्राहकांना आवश्यक त्या सोयी उपलब्ध करून देत असतात.

७) भारतात राष्ट्रीय एकात्मतेची समस्या सहज सोडवता येईल.

उत्तर - हे विधान चूक आहे.

कारण - भारतातील असंख्य जाती, धर्म, भाषा, वंश व प्रांतीय अस्मिता यामुळे राष्ट्रीय एकात्मतेची समस्या गुंतागुंतीची झालेली आहे.

८) १९८० च्या दशकात या मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्ण काळ म्हणतात.

उत्तर - हे विधान चूक आहे.

कारण, 1990 च्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्णकाळ म्हणतात.

९) जागतिकीकरणात बिगर सरकारी संस्थांचे महत्त्व कमी झाले आहे.

उत्तर - हे विधान चूक आहे.

कारण, जागतिकीकरणात बिगर सरकारी संस्थांचे महत्त्व वाढले आहे.

१०) राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना महिला हक्क संरक्षणासाठी करण्यात आली.

उत्तर - हे विधान बरोबर आहे.

कारण, महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक संरक्षणासाठी राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे.

११) भारतीय स्वातंत्र्य चळवळ राष्ट्रीय एकात्मतेस पोषक ठरली.

उत्तर - हे विधान बरोबर आहे.

कारण, स्वातंत्र्य चळवळीमुळे सर्व भारतीय विविधता विसरून एकत्र आल्याने राष्ट्रीय एकात्मतेसाठी भारतीय स्वातंत्र्य चळवळ पोषक ठरली.

१२) राजकीय कार्यकारी प्रमुखांविरोधात लोकायुक्त चौकशी करू शकतात.

उत्तर - हे विधान चूक आहे.

कारण, लोकायुक्तांना फक्त शासकीय अधिकाऱ्यांच्या तक्रारी विरोधात चौकशी करण्याचे अधिकार आहेत.

१३) म्यानमार हा भारताचा पारंपरिक मित्र आहे.

उत्तर - हे विधान बरोबर आहे.

कारण, प्राचीन काळापासून भारताचे म्यानमार सोबत आर्थिक, सांस्कृतिक संबंध आहेत.

१४) सागरमाला या योजनेत रस्त्यांचा व्यापक विकास अभिप्रेत आहे.

उत्तर - हे विधान चूक आहे.

कारण, सागरमाला ही योजना बंदराधिरीत विकासासाठी आहे.

१५) मास्त्रीक्त करार युरोपच्या संरक्षणासाठी करण्यात आला.

उत्तर - हे विधान चूक आहे.

कारण, मास्त्रीक्त करार युरोपियन युनियनच्या स्थापनेसाठी करण्यात आला होता.

१६) भारतातील सहकारी चळवळ बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या वर्चस्वाला उत्तर असू शकते.

उत्तर - हे विधान बरोबर आहे.

कारण, सहकारी चळवळीचे तत्त्वज्ञान त्यात सहभागी सभासदांचे सक्षमीकरण करणे आणि त्यांना वित्तीय आधार देणे आहे.

१७) हवेचे प्रदूषण आणि हवामानबदल या स्वतंत्र बाबी आहेत.

उत्तर - हे विधान चूक आहे.

कारण, हवेचे प्रदूषण आणि हवामान बदल यांचा निकटचा संबंध आहे.

१८) राष्ट्रीय एकात्मतेची समस्या सार्वत्रिक आहे.

उत्तर - हे विधान बरोबर आहे.

कारण, विविध समाज घटकांशी भिन्नतेमुळे अडचणी निर्माण होतात.

१९) पारंपरिक प्रशासन कार्यक्षम होते.

उत्तर - हे विधान चूक आहे.

कारण, पारंपरिक प्रशासनात दप्तर दिरंगाई व लालफितीचा कारभार हे दोष होते.

२०) आज व्हिएतनाम भारताचा महत्वाचे भागीदार देश आहे.

उत्तर - हे विधान बरोबर आहे.

कारण, अमेरिकेच्या व्हिएतनाम मधील हस्तक्षेपाला भारताने विरोध केला होता.

२१) राष्ट्रीय एकात्मता व्यक्ती समुदायाची ओळख पुसून टाकते.

उत्तर - हे विधान चूक आहे.

कारण, राष्ट्रीय एकात्मता समुदायाचे समर्थन करते, विविधतेतून एकात्मता साध्य करते.

बारावी बोर्ड परीक्षा 2025 महत्त्वपूर्ण वस्तुनिष्ठ प्रश्न पहिला

 

बारावी बोर्ड परीक्षा 2025साठी राज्यशास्त्र विषयाचे महत्त्वपूर्ण वस्तुनिष्ठ प्रश्न पहिला 20 गुणांसाठी उत्तरासहित👇

(निळ्या रंगाची वाक्य उत्तरे दर्शवितात.)

प्रश्न पहिला 20 गुणांसाठी सराव



प्रश्न १. अ) कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. (५)  👇                               

१) युरोपीय संघातील देशांत -------- हे राष्ट्रीय चलन म्हणून स्वीकारण्यात आले.

( पाउंड, युरो, फ्रेंक, डोइश मार्क)

२) १९९० चे दशक हे-------- हस्तक्षेपाचा सुवर्णकाळ म्हणावा लागेल.

( मानवतावादी, दहशतवादी,साम्यवादी, तत्त्ववादी)

३) जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम -------- ऑगस्ट २०१९ मध्ये रद्द करण्यात आले.

(३५२,३५६,३७०,३७६)

४) भारत सरकारने पिनाकी चंद्र घोष यांची पहिले लोकपाल म्हणून -------- मध्ये नियुक्ती केली.

(२०१९,२०२१,२०१६,२०१८)

५) अलिप्ततावादाची संकल्पना व धोरण हे ------- यांचे योगदान आहे.

(राष्ट्राध्यक्ष विल्सन, पंडित नेहरू, डॉ.आंबेडकर, महात्मा गांधी)

उत्तर - १) युरो २) मानवतावादी ३)३७० ४)२०१९ ५) पंडित नेहरू

१) १९८९ नंतर आंतरराष्ट्रीय संबंधातील महत्त्वाचा प्रवाह-------.

( दविध्रुवितेचा अस्त, आशियामध्ये प्रादेशिक वादाचा उदय, अलिप्ततावादाचा अंत, नवीन आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेची मागणी)

२) साम्यवादी बाजारपेठीय अर्थव्यवस्था ही संकल्पना --------- या देशात संदर्भात वापरले जाते.

( भारत, चीन, फ्रान्स, अमेरिका)

३) आज भारताचा लिंगभाव निगडित दृष्टीकोण ------- वर लक्ष केंद्रित करतो.

(शिक्षण, लोक कल्याण, विकास, सक्षमीकरण)

४) चारू मुजुमदार-------- शी निगडित आहेत.

(JKLF, नक्षलवादी चळवळ, हिजबुल मुजाहिद्दीन, आसाम तेल कोंडी)

५) अलिप्ततावादाची संकल्पना व धोरण हे ------- यांचे योगदान आहे.

(राष्ट्राध्यक्ष विल्सन, पंडित नेहरू, डॉ.आंबेडकर, महात्मा गांधी)

उत्तर - १) दविध्रुवितेचा अस्त २) चीन ३) सक्षमीकरण 

         ४) नक्षलवादी चळवळ ५) पंडित नेहरू

१) .......... मध्ये ढाका येथे सार्कची स्थापना करण्यात आली

(१९९०, १९८५, १९९५, १९९९)

२) ..........आणि कुडनकुलम येथील आण्विक प्रकल्पांना विरोध केला जात आहे.

( जैतापूर, मुंबई, कोल्हापूर, नागपूर)

३) १९७० चे दशक हे संयुक्त राष्ट्रांचे ...........चे दशक होते.

(साक्षरता, लोक कल्याण, विकास, महिलांसाठी)

४) नक्षलवादी चळवळीची मुळे .......... चळवळीत सापडतात.

(काश्मीर, संयुक्त महाराष्ट्र, तेलंगणा, आसाम)

५) ......... पासून भारतात माहितीचा अधिकार कायदा लागू करण्यात आला.

(२००२,२००७,२००५,२००० )

उत्तर - 1)१९८५ 2) जैतापूर 3) महिलांसाठी 4) तेलंगणा 5) २००५

प्रश्न १. ब) खालीलपैकी गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा. (३)  👇                           

(१) अ) संविधानातील कलम ५१- भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे

      ब) जागतिक अर्थव्यवस्थेचे एकत्रीकरण - १९९० च्या दशकापासून

      क) पंडित नेहरू - भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार

      ड) अलिप्ततावाद - लष्करी कराराचा भाग होणे.

(२) अ) राज्य - कायदा व सुव्यवस्था राखणे

      ब) अराजक - सुशासनाचा अभाव

      क) राष्ट्र - राज्याचे विस्तारित स्वरूप

      ड) राष्ट्रवाद - राजकीय अस्मितेची निर्मिती

(३) अ) शीतयुद्धाची समाप्ती - पूर्व-पश्चिम वादाचा अखेर

      ब) सोव्हिएत युनियनचे विघटन - नवीन राष्ट्रांचा उदय

     क) दविध्रुविता संपुष्टात आली - रशियाची वर्चस्व प्रस्थापित झाले.

     ड) चीन व भारताचा वाढता प्रभाव - बहुध्रुविय व्यवस्थेचा उदय 

 उत्तर - १) अलिप्ततावाद - लष्करी कराराचा भाग न होणे.

           २) राष्ट्र - एकीच्या भावनेने बांधलेला समुदाय.

३) द्वीध्रुवीयता संपुष्टात आली- अमेरिकेचे वर्चस्व प्रस्थापित झाले. 


(१) अ) NATO - युरोप

      ब) ANZUS - आफ्रिका

       क) SEATO - दक्षिण पूर्व आशिया

       ड) CENTO - पश्चिम आशिया

उत्तर - ब) ANZUS - ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, संयुक्त अमेरिका

(२) अ) जवाहरलाल नेहरू - Discovery Of India

      ब) तमिळ लोकांच्या हक्कांसाठी लढा - LTTE

      क) राष्ट्रीय एकात्मता परिषद - कलम ३७०

      ड) पंचायत राज - ७३ वी घटना दुरुस्ती

उत्तर - क) राष्ट्रीय एकात्मता परिषद - १९६१

(३) अ) दप्तर दिरंगाई - पारंपरिक प्रशासन

      ब) पंचवार्षिक योजना - विकास प्रशासन

      क) पारदर्शकता- आधुनिक प्रशासन.

      ड) ऑनलाईन रेल्वे बुकिंग - ई- प्रशासन

उत्तर - क) पारदर्शकता- सुशासन 

(१) अ) पहिली आशियाई परिषद - १९४७

      ब) बांडुंग परिषद - १९५५

      क) सेन फ्रान्सिस्को परिषद - १९२०

      ड) बेलग्रेड परिषद - १९६१

उत्तर - क) सेन फ्रान्सिस्को परिषद - १९४५

(२) अ) पंचायती राज - ७३ वी घटना दुरुस्ती

     ब) आझादी चळवळ- पश्चिम बंगाल

     क) IAS - भारतीय प्रशासकीय सेवा

     ड) बाबरी मशीद घटना- हिंदू-मुस्लिम दंगली

  उत्तर - ब) आझादी चळवळ - जम्मू काश्मिर

(३) अ) भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी - विप्रो

      ब) ट्रान्स नॅशनल कंपनी- ONGC

      क) ट्रान्स नॅशनल कंपनी - जनरल इलेक्ट्रिकल

      ड) अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनी - मॅकडोनाल्ड

         उत्तर -   ब) ट्रान्स नॅशनल कंपनी- नेस्ले 


प्रश्न१) क) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. (४)   👇                               

१) मास्त्रीक्त करार संदर्भ -

    (अ) संयुक्त राष्ट्र शांतता रक्षक दल

    (ब) युरोपीय संघ 

    (क) अमेरिकेचा कुवेत मध्ये हस्तक्षेप 

    (ड) ब्रिक्स ची स्थापना

२) साम्यवादी बाजारपेठीय अर्थव्यवस्था ही संकल्पना या देशात संदर्भात वापरले जाते.

(अ) भारत

(ब) चीन 

(क) फ्रान्स 

(ड) अमेरिका

३) रिओ दि जानेरिओ अर्थ समिट (1992) यावर लक्ष केंद्रित करते.

(अ) पर्यावरण आणि विकास 

(ब) आण्विक प्रसारबंदी 

(क) आंतरराष्ट्रीय व्यापार

(ड) लिंगभाव निगडीत समस्या

४) लोकपाल ही संकल्पना येथून घेण्यात आली.

(अ) अमेरिका 

(ब) युनायटेड किंग्डम

(क) स्वीडन 

(ड) रशिया 

 उत्तर - १) युरोपीय संघ २) चीन ३) पर्यावरण आणि विकास ४) स्वीडन

१) लोकपाल ही संकल्पना येथून घेण्यात आली.

   (अ) अमेरिका

   (ब) युनायटेड किंग्डम

   (क) स्वीडन 

   (ड) रशिया

२) विविधतेत एकता हे महत्त्वपूर्ण भारतीय मूल्ये याच्याशी निगडित आहे-

(अ) पंचायती राज

(ब) राष्ट्रीय एकात्मता

(क) राष्ट्र ही संकल्पना

(ड) Melting Pot ही संकल्पना

३) अलिप्ततावादाचा हा गाभा आहे.

(अ) जागतिक घडामोडींचे स्वतंत्र आकलन 

(ब) शीतयुद्धात सहभाग 

(क) लोकशाही समाजवाद एक धोरण

(ड) प्रादेशिकतावादाचे धोरण

४) भारताने नदी पाणीवाटपाबाबत फराक्का करार या देशाबरोबर केला आहे.

(अ) बांगलादेश 

(ब) पाकिस्तान

(क) चीन 

(ड) नेपाळ

उत्तर - १) स्वीडन २) राष्ट्रीय एकात्मता ३) जागतिक घडामोडींचे स्वतंत्र आकलन ४) बांगलादेश

१) १९९१ नंतर प्रादेशिक वादाचा विकास झाला ;कारण------

(अ) सोवियत रशियाचे विघटन झाले.

(ब) अमेरिकेचे वर्चस्व संपुष्टात आले.

(क) व्यापारी गटांची संख्या व त्यांचे महत्त्व वाढले. 

(ड) एकसंघ व्यवस्थेचा उदय झाला.

२) ७३वी घटना दुरुस्ती करण्यात आली; कारण----

(अ) पंचायती राज सक्षम करण्यासाठी.

(ब) महिला सक्षमीकरणासाठी.

(क) मतदानाची वयोमर्यादा १८ वर्षाची करण्यासाठी.

(ड) मूलभूत हक्क रक्षणासाठी.

३) भारतात राज्यांची भाषावार पुनर्रचना करण्यात आली; कारण----

(अ) राज्यकारभार कार्यक्षम करण्यासाठी.

(ब) अस्तित्वात असलेली राज्य आकाराने मोठी होती.

(क) देशातील प्रदेशांची संस्कृती ओळख निर्माण करण्यासाठी.

(ड) प्रादेशिकतावादाचे धोरण

४) आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंध वृद्धिंगत झाले; कारण----

(अ) जागतिकीकरणाचा प्रसार झाला. 

(ब) सामाजिक माध्यमात अभिसरण वाढले.

(क) परदेशातून स्वस्त कर्ज उपलब्ध होऊ लागले. 

(ड) महागाई कमी झाली.

उत्तर - 1) व्यापारी गटांची संख्या व त्यांचे महत्त्व वाढले.

           2) पंचायतीराज सक्षम करण्यासाठी.

           3) देशातील प्रदेशांची संस्कृतीक ओळख निर्माण

 करण्यासाठी.

           4) जागतिकीकरणाचा प्रसार झाला.


प्रश्न१) ड)दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा. (४)     👇👇

१) जगातील इतर देशांशी संबंध स्थापन करण्याचे साधन-

२) मानवाधिकाराची जोपासना करणारी यंत्रणा -

३) एकीच्या भावनेने बांधलेला समुदाय -

४) जास्त उत्पन्न देणाऱ्या जातीच्या बियाणांचा विकास व सिंचन पद्धतींचा विस्तार -

 उत्तर - १) परराष्ट्र धोरण २) राष्ट्रीय मानवाधिकार आयोग ३) राष्ट्र ४) हरितक्रांती


१) शासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधातील तक्रारींची चौकशी करणारी व्यक्ती-

२) समाजात भीती/ घबराट/धास्ती निर्माण करण्यासाठी हिंसाचाराचा केलेला वापर -

३) आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधी एकमेव आंतरराष्ट्रीय संघटना -

४) जेव्हा एक राज्य इतर राज्यांवर लष्करी ताकदीच्या वापराशिवाय प्रभाव पाडते -

उत्तर - १) लोकपाल आणि लोकायुक्त २) दहशतवाद ३) आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना ४) सॉफ्ट पॉवर


१) शाश्वत जीवनासाठी मिळकतीचा उत्पादक साधनांचा अभाव-

२) भारताचा लष्करी गटात सामील न होण्याचा निर्णय -

३) चीनचा महत्वकांक्षी प्रकल्प-

४) पात्र व्यक्तींना २६ युरोपीय देशांमध्ये मुक्त पुणे प्रवास करण्याची परवानगी -

उत्तर - 1) दारिद्र्य / गरिबी 2) अलिप्ततावाद 3) वन बेल्ट वन रोड 4) शेंगेन व्हिसा


प्रश्न१) ई) गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. (४)                                   👇                                    

१) सार्कचे सदस्य - चीन, भारत, पाकिस्तान, बांगलादेश

२) दंगल, उठाव, हिंसाचार, सत्याग्रह 

३) राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, राष्ट्रीय महिला आयोग, लोकपाल,राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोग,

४) पेटंट, ट्रेडमार्क, कॉपीराइट, शिक्षण

उत्तर - १) चीन २) सत्याग्रह ३) लोकपाल ४) शिक्षण

१) मोबाइल, सॅटॅलाइट, इंटरनेट, ग्रामोफोन

२) दहशतवाद, नक्षलवाद, राष्ट्रवाद, उग्रवाद 

३) जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी

४) हवामान बदल, प्रदूषण, दारिद्र्य, जंगलतोड

उत्तर - १) ग्रामोफोन २) राष्ट्रवाद ३) सोनिया गांधी 

         ४) दारिद्र्य

१) दस्त नोंदणी करणे, दस्तांची प्रमाणित नक्कल देणे, आधार कार्ड देणे, शोध उपलब्ध करून देणे.

२) अक्साईचिन, दलाई लामा, अरुणाचल प्रदेश, मेघालय 

३) आण्विक संशोधन, अवकाश संशोधन, इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञान, बुलेट ट्रेन

४) भाषावाद, राष्ट्रवाद, जमातवाद, प्रांतवाद

उत्तर - 1) आधार कार्ड देणे 2) मेघालय 3) बुलेट ट्रेन 4) राष्ट्रवाद

समाप्त...... ✌✌✌





                                




HSC Board feb 2025 Result

   HSC Board feb 2025 Result HSC Board Exam February 2025 Result Date  05/05/2025   इयत्ता बारावी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी 2025 निकाल दिनांक...