Tuesday, February 11, 2020

HSC बोर्ड परीक्षा 2020 साठी राज्यशास्त्र विषयाचे महत्त्वाचे 50 प्रश्न (उत्तरासह)


HSC बोर्ड परीक्षा 2020 साठी राज्यशास्त्र विषयाचे महत्त्वाचे 50 प्रश्न (उत्तरासह)



 पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एका वाक्यात लिहा :

(१) भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्ताची नेमणक कोण करतो?
उत्तर- राष्ट्रपती

(२) सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून कोणत्या कारणास्तव पदमुक्त करण्यात येते?
 उत्तर-   गैरवर्तन व अकार्यक्षमता

(३) सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर बांधला जात आहे?
उत्तर- नर्मदा

(४) सुवर्ण मंदिरातून अतिरेक्यांना बाहेर काढण्यासाठी कोणती कारवाई केली गेली?
उत्तर- ऑपरेशन ब्ल्यू स्टार

(५) घटकराज्यांच्या आणीबाणीला काय म्हणतात?
उत्तर- राष्ट्रपती राजवट

(६) इ. स. २००९ मध्ये कोणता अधिकार मूलभूत अधिकार म्हणून स्वीकारण्यात आला?
उत्तर- शिक्षनाचा हक्क

(७) महसूल न्यायालयाच्या उतरंडीमध्ये कोणते न्यायालय सर्वांत कनिष्ठ न्यायालय आहे?
उत्तर- तहसील

(८) रिपब्लिकन पक्ष कोणत्या राज्यात प्रभावी आहे?
उत्तर- महाराष्ट्र

(९) राष्ट्रपती व उपराष्ट्रपती या पदांसाठीच्या निवडणुका कोण घेतो?
उत्तर- निवडणूक आयोग

(१०) वार्षिक अंदाजपत्रक संसदेत सादर करण्याचे आदेश मंत्रिमंडळाला कोण देतो?
उत्तर- राष्ट्रपती

(११) एकपक्ष पद्धत म्हणजे काय?
उत्तर- एकच पक्ष असतो, दुसरा राजकीय पक्ष अस्तीत्वात नसतो.

(१२) राष्ट्रपती व मंत्रिमंडळ यांच्यातील दव्याचे काम कोण करतो?
उत्तर- पंतप्रधान

(१३) ग्राहक संरक्षण कायदा कोणत्या राज्याला लागू नाही?
उत्तर- जम्मू आणि काश्मीर

(१४) भारतात कोणती पक्ष पद्धत आहे?
उत्तर- बहुपक्ष

(१५) 'स्वाभिमानी शेतकरी संघटने'ची स्थापना कोणी केली?
उत्तर- राजू शेट्टी

(१६) आणीबाणीनंतर जनता पक्षाला विजयाकडे नेणाऱ्या प्रमुख नेत्याचे नाव सांगा.
उत्तर- जयप्रकाश नारायण

(१७) 'चिपको' आंदोलनाचे प्रणेते कोण आहेत?
उत्तर- सूंदरलाल बहुगुणा

(१८) राज्यपालांची नेमणूक कोणाकडून केली जाते?
उत्तर- राष्ट्रपती

(१९) मानवी हक्कांचा जाहीरनामा कोणत्या संघटनेने घोषित केला?
उत्तर- संयुक्त राष्ट्र

(२०) राज्यसभा सदस्यांचा सामान्य कार्यकाल किती असतो?
उत्तर- ६ वर्ष

(२१) मूलभूत हक्कांबाबतची प्रकरणे कोणत्या न्यायालयात दाखल केली जातात?
उत्तर- उच्च आणि सर्वोच्च न्यायालय

(२२) भारताच्या केंद्रीय कायदेमंडळाचे नाव काय?
उत्तर- संसद/पार्लमेंट

(२३) महाराष्ट्रातून राज्यसभेवर किती सदस्य निवडले जातात?
उत्तर- १९

(२४) भारतात किती घटकराज्यांची कायदेमंडळे द्विसभागृही आहेत?
उत्तर- सहा/सात

(२५) भारताचे घटनात्मक प्रमुख कोण आहेत?
उत्तर- राष्ट्रपती

(२६) महाराष्ट्राचे उच्च न्यायालय कोठे स्थित आहे?
उत्तर- मुंबई

(२७) संसदेत सरकारी विधेयक कोणाकडून सादर केले जाते?
उत्तर- मंत्र्याकडून

(२८) चीनमध्ये कोणती पक्ष पद्धती आहे?
उत्तर- एकपक्ष

(२९) महाराष्ट्रात शेतकरी संघटनेचा नेता कोण आहे?
उत्तर- शरद जोशी

(३०) केंद्र सरकारचा कायदेविषयक सल्लागार कोण असतो?
उत्तर-महान्यायवादी

(३१) भारतात राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकांचे आयोजन कोण करतो?
उत्तर- निवडणूक आयोग

(३२) मानवी हक्कांचा जागतिक जाहीरनामा कोणत्या संघटनेने जाहीर केला?
उत्तर- संयुक्त राष्ट्र

(३३) भारताच्या कायदेमंडळास काय म्हणतात?
उत्तर- संसद/पार्लमेंट

(३४) भारतात सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या साली झाली?
उत्तर- १९५०

(३५) अमेरिकेमध्ये कोणती पक्षपद्धती आहे?
उत्तर- द्वीपक्ष

(३६) २०११ -१२ मध्ये भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले?
उत्तर- अण्णा हजारे

(३७) महाराष्ट्रात मुलींची पहिली शाळा कोठे सुरू झाली?
उत्तर- पुणे

(३८) जम्मू-काश्मीरमध्ये 'नॅशनल कॉन्फरन्स' या राजकीय पक्षाची स्थापना कोणी केली?
उत्तर- शेख अब्दुल्ला

(३९) भारतामध्ये शेषाधिकार कोणाकडे आहेत ?
उत्तर- केंद्राकडे

(४०) भारतामध्ये प्रौढ मताधिकार कोणत्या वर्षी मिळतो?
उत्तर- १८

(४१) 'सरकारी विधेयक' म्हणजे काय?
उत्तर- मंत्रीमंडळाद्वारे सभागृहात मांडलेले विधेयक

(४२) भारताच्या राष्ट्रपतींविरुद्ध महाभियोग चालवण्याचा अधिकार कोणाला असतो?
उत्तर- संसदेला

(४३) 'न्यायालयीन पुनर्विलोकन' म्हणजे काय?
उत्तर- कायदेमंडळाने संमत केलेला कायदा जर घटनेशी सुसंगत नसेल किंवा कायद्यामुळे जर मूलभूत हक्क धोक्यात येत असतील तर न्यायालय त्यास घटनाबाह्य घोषित करू शकते, त्यास न्यायालयीन पुनर्विलोकन असे म्हणतात.

(४४) जगातील बहुपक्ष पद्धती असलेल्या दोन राष्ट्रांची नावे सांगा.
उत्तर- भारत,फ्रान्स

(४५) तेलंगणा राज्याची मागणी कोणत्या राज्यातील लोकांनी केली?
उत्तर- आंध्रप्रदेश

(४६) मंडल आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी केलेल्या सरकारचे नाव लिहा.
उत्तर- १९८९ सालचे राष्ट्रीय आघाडी सरकार

(४७) पंजाब व हरियाणा या दोन राज्यांत कोणत्या शहरावरून विवाद आहे ?
उत्तर- चंदीगड

 (४८) पहिल्या मागासवर्गीय आयोगाचेे अध्यक्ष कोण?
उत्तर- काकासाहेब कालेलकर

 (४९) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची स्थापना केव्हा झाली?
 उत्तर- १८८५

 (५०) भारतीय घटना समितीचे अध्यक्ष कोण होते?
 उत्तर- डॉ. राजेन्द्र प्रसाद

23 comments:

  1. Thank you for helping 🙏🙏🙏

    ReplyDelete
  2. धन्यवाद सर ... पण तूम्ही बाकी विषयाचे (इतिहास, समाजशास्ञ, अर्थशास्ञ) ष्रश्न काढले असेल तर ते तूम्ही मला पाठवाल का?
    खाली माझा वाँटसप नंबर आहे
    9370503047

    ReplyDelete
  3. Please sir ankhin subject che pathwa

    ReplyDelete
  4. Thank sir for my helping in exam

    ReplyDelete
  5. Hi sir मला आजुन ़़भुगोल, संरक्षण, गंथालय चे पश्न पाडवा

    ReplyDelete
  6. माझा नंबर ७७०९६३७६२६

    ReplyDelete
  7. Sir please history cha pan sang khup chan ahe he 🙏🙏🙏

    ReplyDelete
  8. Thank you for so much sir
    This is my WhatsApp number 8308088251
    Please Shere me this type notification

    ReplyDelete

HSC Board feb 2025 Result

   HSC Board feb 2025 Result HSC Board Exam February 2025 Result Date  05/05/2025   इयत्ता बारावी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी 2025 निकाल दिनांक...