पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण सांगा :
(१) प्रत्येक देशासाठी संविधानाची आवश्यकता असते.
उत्तर- बरोबर
(२) राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे राज्यांवर बंधनकारक आहेत.
उत्तर- चूक
(३) विधानसभा हे स्थायी सभागृह आहे.
उत्तर- चूक
(४) काही राज्यांत लोक न्यायालयांची स्थापना करण्यात आली आहे.
उत्तर- बरोबर
(५) तेलुगु देसम हा महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष आहे.
उत्तर- चूक
(६) १९७२ साली 'दलित पँथर' ही क्रांतिकारी संघटना स्थापन झाली.
उत्तर- बरोबर
(७) भारतात प्रत्येक मंत्री संसदेचा सदस्य असलाच पाहिजे.
उत्तर- चूक
(८) भारतीय नागरिकांना कोणताही धर्म स्वीकारण्याचे स्वातंत्र्य आहे.
उत्तर- बरोबर
(९) संसदेच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान राष्ट्रपती भूषवतात.
उत्तर- चूक
(१०) सर्वोच्च न्यायालय हे शिखर न्यायालय आहे.
उत्तर- बरोबर
(११) बहुपक्ष पद्धतीमध्ये शासनात अस्थिरता निर्माण होते.
उत्तर- बरोबर
(१२) कामगार संघटना आणि राजकीय पक्ष यांच्यात घनिष्ठ संबंध असतो.
उत्तर- बरोबर
(१३) तेलंगणाची मागणी केरळ राज्यातून करण्यात आली.
उत्तर- चूक
(१४) मूलभूत हक्काचे उल्लंघन झाल्यास कोणालाही न्यायालयात दाद मागता येते.
उत्तर- बरोबर
(१५) एकपक्ष पद्धतीमध्ये अनेक पक्ष निवडणूक लढवू शकतात.
उत्तर- चूक
(१६) न्यायाधीशांना आकर्षक वेतन दिले गेले पाहिजे.
उत्तर- बरोबर
(१७) प्रधानमंत्री हे नियोजन आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात.
उत्तर- बरोबर
(१८) सर्वसामान्यपणे राज्याचा रहिवासी हा राज्याचा राज्यपाल म्हणून निवडला जातो.
उत्तर- चूक
(१९) भारतात एक प्रबळ पक्ष पद्धती नाकारली गेली आहे.
उत्तर- बरोबर
(२०) भारतातील सर्व घटकराज्यांत दविगृही कायदेमंडळे आहेत.
उत्तर- चूक
(२१) घटकराज्याचे मुख्यमंत्री विधेयक राष्ट्रपतीकडे संमतीसाठी पाठवू शकतात.
उत्तर- चूक
(२२) सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे वेतन भारताच्या संचित निधीतून दिले जाते.
उत्तर- बरोबर
(२३) बहुपक्ष पद्धतीत शासन अस्थिर बनते.
उत्तर- बरोबर
(२४) वटहुकूम हा तात्पुरता कायदा असतो.
उत्तर- बरोबर
(२५) शिक्षणाचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे.
उत्तर- बरोबर
(२६) राज्यसभा अध्यक्ष हे राज्यसभेचे सदस्य असतात.
उत्तर- चूक
(२७) पंतप्रधानांचा/प्रधानमंत्र्याचा राजीनामा हा संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा समजला जातो.
उत्तर- बरोबर
(२८) जातीयवाद हा राष्ट्रीय एकात्मतेच्या मार्गातील एक अडथळा आहे.
उत्तर- बरोबर
(२९) लोकशाही शासनपदधतीमध्ये सामाजिक व राजकीय चळवळींना स्थान नाही.
उत्तर- चूक
(३०) भारतामध्ये लोकांना कोठेही वास्तव्य करण्याचे स्वातंत्र्य आहे.
उत्तर- बरोबर
(३१) राज्यसभा कधीही बरखास्त होत नाही.
उत्तर- बरोबर
(३२) राज्यपालाची नेमणूक पंतप्रधानाकडून / प्रधानमंत्र्यांकडून होते.
उत्तर- चूक
(३३) सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय आहे.
उत्तर- बरोबर
(३४) राजकीय पक्ष हा लोकशाहीचा आत्मा नाही.
उत्तर- चूक
(३५) भारतात स्त्रियांसाठी स्थानिक शासनसंस्थांमध्ये आरक्षण नाही.
उत्तर- चूक
(३६) भारतात पाच घटकराज्यांमध्ये द्विसभागृही कायदेमंडळे Nआहेत.
उत्तर- चूक
(३७) भारताची न्यायव्यवस्था दुहेरी स्वरूपाची आहे.
उत्तर- चूक
(३८) भारतात राज्यांची पुनर्रचना जातींच्या आधारावर केली गेली.
उत्तर- चूक
(३९) भारतात आणीबाणी जाहीर करण्याचा अधिकार पंतप्रधानांना आहे.
उत्तर- चूक
(४०) भारतातील सर्वोच्च न्यायालय मुंबई या ठिकाणी आहे.
उत्तर- चूक
No comments:
Post a Comment