Wednesday, February 26, 2020

S.S.C Board Exam 2023 साठी राज्यशास्त्र विषयाचे महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरासह (रिकाम्या जागा)


S.S.C Board Exam 2023 साठी राज्यशास्त्र विषयाचे महत्त्वाचे सराव प्रश्न  (रिकाम्या जागा)



दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय लिहा  :

(१) 'महाराष्ट्रात स्थानिक शासनसंस्थांमध्ये महिलांसाठी---------
टक्के जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत.
(अ) २५
 (ब) ३०
 (क) ४०
(ड) ५०
उत्तर- ५० 

(२) पुढीलपैकी कोणत्या कायद्याद्वारे महिलांना त्यांचे स्वातंत्र्य
जपण्यासाठी आणि स्वत:चा विकास साधण्यासाठी अनुकूल
वातावरण निर्माण केले आहे? -----------
(अ) माहितीचा अधिकार कायदा
(ब) हुंडा प्रतिबंधक कायदा
(क) अन्नसुरक्षा कायदा
(ड) यांपैकी कोणताही नाही.
उत्तर-  हुंडा प्रतिबंधक कायदा

(३) लोकशाहीचा गाभा म्हणजे --------- होय.
(अ) प्रौढ मताधिकार
(ब) सत्तेचे विकेंद्रीकरण
(क) राखीव जागांचे धोरण
 (ड) न्यायालयीन निर्णय
उत्तर- सत्तेचे विकेंद्रीकरण

(४) भारतात २६ जानेवारी १९५० पासून --------- राज्यकारभार
करण्यास सुरुवात झाली.
(अ) राष्ट्रपतींच्या आदेशानुसार
(ब) संसदेच्या कायदयानुसार
(क) संविधानानुसार
(ड) न्यायालयाच्या आदेशानुसार
उत्तर-  संविधानानुसार

(५) भारतात आता .......... वर्षे पूर्ण झालेल्या सर्व स्त्री-परुषांना
मतदानाचा अधिकार मिळाला आहे.
(अ) १५
 (ब) १८
 (क) २१
(ड) २५
उत्तर- १८ 

(६) निवडणूक आयुक्तांची नेमणूक --------- करतात.
(अ) राष्ट्रपती
(ब) प्रधानमंत्री
(क) लोकसभेचे सभापती
 (ड) उपराष्ट्रपती
उत्तर- राष्ट्रपती

(७) स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून
--------- यांची नेमणूक झाली होती.
(अ) डॉ. राजेंद्रप्रसाद
(ब) टी. एन. शेषन
(क) सुकुमार सेन
 (ड) नीला सत्यनारायण
उत्तर- सुकुमार सेन

(८) मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाची
--------- समिती करते.
(अ) निवड
(ब) परिसीमन
(क) मतदान
(ड) वेळापत्रक
उत्तर-  परिसीमन

(९) भारतीय संविधानाच्या ......... व्या कलमान्वये 'निवडणूक
आयोग' या स्वायत्त यंत्रणेची निर्मिती केली गेली.
(अ) ३५१
 (ब) ३७०
 (क) ३२४
 (ड) ३०१
उत्तर- ३२४

(१०) जस्टीस पार्टी या ब्राह्मणेतर चळवळीचे रूपांतर----------
या राजकीय पक्षात झाले.
(अ) आसाम गण परिषद
(ब) शिवसेना
(क) द्रविड मुन्नेत्र कळघम
(ड) जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स
 उत्तर- द्रविड मुन्नेत्र कळघम

(११) निवडणुकीत ज्या पक्षांना बहुमत मिळत नाही, ते ---------
पक्ष म्हणून ओळखले जातात.
(अ) सत्ताधारी
 (ब) विरोधी
(क) अपक्ष
(ड) स्वतंत्र
उत्तर- विरोधी 

(१२) १९८० मध्ये जनता पक्ष फुटून त्यातील --------- 'भारतीय
जनता पक्ष' या नव्या पक्षाची स्थापना केली.
(अ) स्वतंत्र पक्षाने
 (ब) लोकदलाने
(क) जनता दलाने
(ड) जनसंघाने
उत्तर- जनसंघाने

(१३) राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन
निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात; तेव्हा त्या संघटनांना-----------
असे म्हटले जाते.
(अ)सरकार
(ब) समाज 
(क) राजकीय पक्ष
(ड) सामाजिक संस्था
उत्तर- राजकीय पक्ष 

(१४) नैशनल कॉन्फरन्स हा पक्ष------ या राज्यात आहे.
(अ) ओडिशा
(ब) आसाम
(क) बिहार
(ड) जम्मू आणि काश्मीर
उत्तर- जम्मू आणि काश्मीर

 (१५) शेतकरी चळवळीची --------- ही प्रमुख मागणी आहे.
(अ) वनजमिनींवर लागवड करण्याचा अधिकार मिळावा.
 (ब) शेतमालाला योग्य भाव मिळावा.
(क) ग्राहकांचे संरक्षण करावे.
(ड) धरणे बांधावीत.
उत्तर- शेतमालाला योग्य भाव मिळावा.

 (१६) शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत
स्वयंपूर्ण होण्यासाठी -------- करण्यात आली.
(अ) जलक्रांती
(ब) हरितक्रांती
(क) औदयोगिक क्रांती
(ड) धवलक्रांती
उत्तर- हरितक्रांती

(१७) ----------चळवळींना फार महत्त्व असते.
(अ) समाजवादी व्यवस्थेत
(ब) हुकूमशाहीमध्ये
(क) लोकशाहीत
(ड) कम्युनिस्ट शासनात
उत्तर- लोकशाहीत 

(१८) लोकशाहीत --------- एक महत्त्वाचा अधिकार नागरिकांना
मिळालेला असतो.
(अ) पुनर्वसन होण्याचा
(ब) प्रश्नांचा पाठपुरावा करण्याचा
(क) संयमाने व जबाबदारीने वागण्याचा
(ड) प्रतिकार करण्याचा
उत्तर- प्रतिकार करण्याचा

(१९) हरितक्रांती --------- या उद्देशाने करण्यात आली.
(अ) पर्यावरणाचा -हास थांबवणे.
(ब) जंगलांचे संरक्षण व वृद्धी करणे.
(क) शेतीचे उत्पादन वाढवून देश स्वावलंबी बनवणे.
(ड) वृक्षतोड थांबवणे.
उत्तर- शेतीचे उत्पादन वाढवून देश स्वावलंबी बनवणे.

(२०) जगातील सर्वच लोकशाही राष्ट्रांपुढील मोठे आव्हान म्हणजे ----------
(अ) धार्मिक संघर्ष .
(ब) नक्षलवादी कारवाया .
(क)लोकशाहीची पाळेमुळे आणखी खोलवर नेणे.
(ड) गुंडगिरीला महत्त्व .
उत्तर - लोकशाहीची पाळेमुळे आणखी खोलवर नेणे.



5 comments:

  इ. १२ वीचा निकाल २१/०५/२०२४ रोजी दुपारी १:०० नंतर खालील साईटवर पहा. 1. https://hsc.mahresults.org.in/