Thursday, February 27, 2020

S.S.C Board Exam 2023 साठी इतिहास विषयाचे महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरासह (रिकाम्या जागा)



S.S.C Board Exam 2023 साठी इतिहास विषयाचे महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरासह (रिकाम्या जागा)



S.S.C Board Exam 2023 साठी इतिहास विषयाचे महत्त्वाचे सराव प्रश्न  (रिकाम्या जागा)




प्रश्न - दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा
लिहा :

(१) आधुनिक इतिहासलेखनाचा जनक' --------- यास म्हणता
येईल.
(अ) व्हॉल्टेअर
(ब) रेने देकार्त
(क) लिओपॉल्ड रांके
 (ड) कार्ल मार्क्स
उत्तर- व्हॉल्टेअर

 (२) 'आर्केऑलॉजी ऑफ नॉलेज' हा ग्रंथ ------
लिहिला.
(अ) कार्ल मार्क्स
(ब) मायकेल फुको
(क) लुसिआँ फेबर
(ड) व्हॉल्टेअर
उत्तर- मायकेल फुको

(३) इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला ---------' असे म्हणतात.
(अ) पुरातत्त्वज्ञ
(ब) इतिहासकार
(क) भाषाशास्त्रज्ञ
(ड) समाजशास्त्रज्ञ
उत्तर- इतिहासकार

(४) जगातील सर्वांत प्राचीन शिलालेख -------- संग्रहालयात
ठेवलेला आहे.
(अ) इंग्लंडच्या
(ब) अमेरिकेच्या
(क) जर्मनीच्या
 (ड) फ्रान्सच्या
उत्तर- फ्रान्सच्या

(५) भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे --------- हे पहिले
सरसंचालक होत.
(अ) अलेक्झांडर कनिंगहॅम
 (ब) विल्यम जोन्स
(क) जॉन मार्शल
(ड) फ्रेडरिक मॅक्सम्युलर
उत्तर - अलेक्झांडर कनिंगहॅम

(६) 'हितोपदेश' या संस्कृत ग्रंथाचा-------- यांनी जर्मन
भाषेत अनुवाद केला.
(अ) जेम्स मिल
(ब) फ्रेडरिक मॅक्सम्युलर
(क) माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन
(ड) जॉन मार्श
उत्तर - फ्रेडरिक मॅक्सम्युलर

(७) भारतात कोरीव लेखांच्या स्वरूपात लिखित साहित्याची
सुरुवात----------- याच्या काळापासून झाली.
(अ) सम्राट अकबर
 (ब) सम्राट हर्षवर्धन 
(क) सम्राट अशोक
 (ड) सम्राट औरंगजेब
उत्तर- सम्राट अशोक

(८) इसवी सनाच्या सातव्या शतकात बाणभट्ट या कवीने
लिहिलेले ----------' हे संस्कृत काव्य ऐतिहासिक
चरित्रग्रंथाच्या स्वरूपाचे आहे.
(अ) मेघदूत
(ब) राजतरंगिणी गाय
(क) रसरत्नाकर
(ड) हर्षचरित
उत्तर- हर्षचरित

(९) इसवी सनाच्या बाराव्या शतकात ------- याने लिहिलेला 'राजतरंगिणी' हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे.
(अ) बााणभट्ट
(ब) कल्हण
(क) पतंजली
 (ड) विशाखदत्त
उत्तर- कल्हण

 (१०) जगातील सर्वांत प्राचीन संग्रहालय---------
उत्खनन करताना सापडले.
(अ) दिल्ली
 (ब) हडप्पा
(ड) कोलकाता
(क) उर
उत्तर- उर

(११) भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार ......येथे आहे.
(अ) दिल्ली
(ब) कोलकाता
(क) मुंबई
 (ड) चेन्नई
उत्तर- दिल्ली

(१२) भारतातील -----या शहरात 'सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी' या संस्थेत 'जनांसाठी इतिहास' या विषयातील संशोधनाचे काम चालते.
(अ) मुंबई
(ब) बेंगळुरू
(क) चेन्नई
(ड) कोलकाता
उत्तर - बेंगळुरू

(१३)--------- ही विज्ञान आणि इतर सर्वच ज्ञानशाखांची जननी मानली जाते.
(अ) तत्त्वज्ञान
(ब) इतिहास
(क) तंत्रज्ञान
(ड) अध्यात्म
उत्तर- तत्त्वज्ञान

(१४) सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे जतन व संवर्धन व्हावे;या हेतूने ---------- या जागतिक संघटनेने दिशादर्शक तत्त्वे जाहीर केलेली आहेत.
(अ) राष्ट्रसंघ
(ब) संयुक्त राष्ट्र
(क) युनेस्को
(ड) विश्वस्त मंडळ
उत्तर- युनेस्को

(१५) सातारा जिल्ह्यातील ------- हे पश्चिम घाटरांगांमधील
ठिकाण युनेस्कोच्या जागतिक नैसर्गिक वारशाच्या यादीत
समाविष्ट आहे.
(अ) बालाघाटचा डोंगर
(ब) मेळघाट
(क) मसाईचे पठार
(ड) कास पठार
उत्तर- कास पठार

 (१६) चित्रकला आणि शिल्पकला यांचा -------" मध्ये समावेश होतो.
(अ) दृक्कला
(ब) ललित कला
(क) लोककला
 (ड) अभिजात कला
उत्तर- दृक्कला

(१७) मथुरा शिल्पशैली--------- काळात उदयाला आली.
(अ) कुशाण
(ब) गुप्त
(क) राष्ट्रकूट
(ड) मौर्य
उत्तर- कुशाण

(१८) ललित कलांना ‘---------' असेही म्हटले जाते.
(अ) लोककला
 (ब) आंगिक कला
(क) दृक्कला
(ड) नागरकला
उत्तर -आंगिक कला

(१९) ठाणे जिल्ह्यातील जिव्या सोम्या मशे यांचा --------
चित्रकला' लोकप्रिय करण्यात मोठा वाटा आहे.
(अ) चित्रकथी
(ब) मराठा
(क) वारली
(ड) अभिजात
उत्तर - वारली

(२०)भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र .....
यांनी सुरू केले.
 अ) जेम्स ऑगस्टस हिकी
 (ब) सर जॉन मार्शल
 (क) अॅलन ह्यूम
 (ड) माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन
उत्तर- जेम्स ऑगस्टस हिकी

(२१) दूरदर्शन हे--------- माध्यम आहे.
(अ) दृक्
(ब) श्राव्य
(क) दृक्-श्राव्य
(ड) मुद्रण
उत्तर - दृक्-श्राव्य

(२२)--------- हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र होय.
(अ) दीनबंधू
(ब) प्रभाकर
(क) दर्पण
(ड) केसरी
उत्तर- दर्पण

(२३) ६ जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात ---------' म्हणून साजरा केला जातो.
(अ) वृत्तपत्र दिन
 (ब) पत्रकार दिन
(क) मुद्रण दिन
(ड) नियतकालिक दिन
उत्तर- पत्रकार दिन

(२४) 'प्रभाकर' या वर्तमानपत्रातून ------- यांची समाजप्रबोधनपर 'शतपत्रे' प्रसिद्ध झाली.
(अ) भाऊ महाजन
 (ब) बाळशास्त्री जांभेकर
(क) लोकहितवादी
(ड) कृष्णराव भालेकर
उत्तर- लोकहितवादी

(२५) महाराष्ट्राचे आदय कीर्तनकार --------- यांना मानतात.
(अ) संत ज्ञानेश्वर
(ब) संत तुकाराम
(क) संत नामदेव
(ड) संत एकनाथ
उत्तर- संत नामदेव

(२६)बाबूराव पेंटर यांनी ----------' हा चित्रपट काढला.
(अ) पुंडलिक
(ब) राजा हरिश्चंद्र
(क) सैरंध्री
(ड) बाजीराव-मस्तानी
उत्तर- सैरंध्री

(२७) अठराव्या शतकात-------- यांनी दशावतारी खेळ दाखवणारा फड स्थापन करून तो महाराष्ट्रभर नेला.
(अ) संत गाडगे महाराज
(ब) अज्ञानदास
(क) श्यामजी नाईक काळे
(ड) तुळशीदास
उत्तर-श्यामजी नाईक काळे

(२८) परंपरेनुसार कीर्तनपरंपरेचे आदय प्रवर्तक ---------
असे मानले जाते.
(अ) संत नामदेव
 (ब) संत एकनाथ
(क) संत गाडगेमहाराज
 (ड) नारदमुनी
उत्तर - नारदमुनी

(२९) ऑलिम्पिक स्पर्धांची परंपरा -------- येथे सुरू झाली.
(अ) ग्रीस
(ब) रोम
(क) भारत
 (ड) चीन
उत्तर - ग्रीस

 (३०) महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला "--------
असे म्हणत.
 (अ) ठकी
 (ब) कालिचंडिका
 (क) गंगावती
 (ड) चंपावती
उत्तर- ठकी

(३१) मनोरंजन व शारीरिक व्यायाम यांसाठी केली जाणारी कोणतीही कृती म्हणजे ---------' होय.
(अ) प्रयोग
 (ब) प्रवृत्ती
 (क) खेळ
(ड) स्पर्धा
उत्तर- खेळ

(३२) खेळ ही माणसाची -------प्रवृत्ती आहे.
(अ) कृत्रिम
 (ब) नैसर्गिक
(क) सांघिक
(ड) निकोप
उत्तर- नैसर्गिक

(३३) कुकने------ विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू केला.
(अ) हस्तकौशल्याच्या वस्तू
(ब) खेळणी
(क) खादयवस्तू
(ड) पर्यटन तिकिटे
उत्तर -पर्यटन तिकिटे

(३४) महाबळेश्वरजवळील भिलार हे ---------- गाव' म्हणून
प्रसिद्ध आहे.
(अ) पुस्तकांचे
(ब) वनस्पतींचे
(क) आंब्यांचे
(ड) किल्ल्यांचे
उत्तर- पुस्तकांचे

(३५) इ.स. ६३० मध्ये चिनी प्रवासी------- भारतात आला
होता.
(अ) हो चि मिन्ह
(ब) चौ एन लाय
(क) युआन श्वांग
 (ड) फायियान
उत्तर- युआन श्वांग

(३६) -----------भारतातून परदेशात जाणाऱ्यांची व परदेशातून भारतात येणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
(अ) भारताच्या स्वातंत्र्यानंतर
(ब) १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामानंतर
(क) आर्थिक उदारीकरणानंतर
(ड) भारतात रेल्वेची बांधणी झाल्यानंतर
उत्तर- आर्थिक उदारीकरणानंतर

(३७) महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित असणाऱ्या किल्ल्यांवर दुर्ग अभ्यासक-------- हे दुर्गभ्रमण यात्राआयोजित करीत असत.
(अ) ना. स. इनामदार
(ब) रणजीत देसाई 
(क) विष्णुभट गोडसे
(ड) गोपाळ नीळकंठ दांडेकर
उत्तर- गोपाळ नीळकंठ दांडेकर

 (३८) लिओनार्दो-द-विंची या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकाराने रेखाटलेल्या -----------' या चित्राचा समावेश लुव्र संग्रहालयात आहे.
(अ) नेपोलियन
(ब) मोनालिसा
(क) हॅन्स स्लोअन
(ड) दुसरा जॉर्ज
उत्तर- मोनालिसा

(३९) कोलकाता येथील---------हे भारतातील पहिले
संग्रहालय होय.
(अ) गव्हन्मेंट म्युझियम
(ब) राष्ट्रीय वस्तू संग्रहालय
(क) छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय
(ड) भारतीय संग्रहालय
उत्तर- भारतीय संग्रहालय

(४०) जे दस्तऐवज प्रदर्शित केले जात नाहीत, असे महत्त्वाचे
अभिलेख------- जतन केले जातात.
(अ) संग्रहालयात
(ब) ग्रंथालयात
(क) अभिलेखागारांमध्ये
 (ड) सरकारदप्तरी
उत्तर -अभिलेखागारांमध्ये

(४१ ) सोळाव्या शतकात होऊन गेलेला फ्रान्सचा राजा पहिला
फ्रान्सिस याच्या पदरी --------- हा प्रसिद्ध इटालियन चित्रकार होता.
(अ) रॅफेल
(ब) लिओनार्दो-द-विंची
(क) मायकेल अँजेलो
 (ड) डोनॅटो ब्रमान्टे
उत्तर- लिओनार्दो-द-विंची

(४२) नेपोलियन बोनापार्ट याने आपल्या स्वाऱ्यांच्या दरम्यान
मायदेशी आणलेल्या कलावस्तूंमुळे --------- संग्रहालयातील
वस्तूंचा संग्रह खूपच वाढला.
(अ) नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी
(ब) ब्रिटिश संग्रहालय
(क) लुव्र
(ड) द कॅलिको म्युझियम
उत्तर- लुव्र

(४३) शिवरायांच्या काळात---------- या कवीने रचलेला अफजल खान वधा विषयीचा पोवाडा प्रसिद्ध आहे.
(अ)अज्ञानदास
(ब) तुळशीदास
(क) रामदास
 (ड)सूरदास
उत्तर-अज्ञानदास

(४४) ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याच्या परंपरेची सुरुवात मेसोपोटेमियातील ---------संस्कृतीमध्ये झाली.
(अ)सुमेर
 (ब)इजिप्शियन
 (क) अरब
 (ड) मोहेंजोदडो
उत्तर- सुमेर

(४५) चालुक्य राजा सोमेश्वर याने ---------- या ग्रंथात चित्रकथी परंपरा याचे वर्णन केलेले आहे.
(अ) नाट्यशास्त्र
(ब) किताब ए नवरस
(क)अजिंठ्याची चित्रकला
(ड)अभिलषितार्थ चिंतामणी
उत्तर- अभिलषितार्थ चिंतामणी

37 comments:

  1. Thanks for basic questions....

    ReplyDelete
  2. 👑🥰Wow ❤🙏🏻🙏🏻

    ReplyDelete
  3. Very nice👍🏻👍🏻👍🏻

    ReplyDelete
  4. This comment has been removed by the author.

    ReplyDelete

  इ. १२ वीचा निकाल २१/०५/२०२४ रोजी दुपारी १:०० नंतर खालील साईटवर पहा. 1. https://hsc.mahresults.org.in/