S.S.C Board Exam 2023 साठी इतिहास विषयाचे महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरासह
(संकल्पना व टिपा)
S.S.C Board Exam 2023 साठी इतिहास विषयाचे महत्त्वाचे सराव प्रश्न (संकल्पना व टीपा)
प्रश्न- संकल्पना लिहा.
(१) द्वंदवाद -
एखाद्या घटनेचा अर्थ लावण्यासाठी परस्परविरोधी असे दोन सिद्धांत मांडून त्यातून योग्य तर्क लावला जातो या मांडणीला द्वंदवाद असे म्हणतात.
जॉर्ज हेगेल याने या सिद्धांताची मांडणी केली. थोडक्यात दोन परस्पर विरोधी विचारांच्या चर्चेतून जी समन्वयात्मक मांडणी होते त्या पद्धतीलाच द्वंदवाद असे म्हणतात.
(२) ॲनल्स प्रणाली
राजकीय अभ्यासाबरोबरच स्थानिक लोक तत्कालीन हवामान, व्यापार, शेती, तंत्रज्ञान, दळणवळण व संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यांचाही अभ्यास करणे महत्त्वाचे मानले जाऊ लागले, या विचारप्रणालीला ॲनल्स प्रणाली असे म्हणतात.
ॲनल्स म्हणजे वार्षिक इतिवृत्त. घटना ज्या काळात घडलली तिचा केवळ राजकीय नव्हे तर तत्कालीन सामाजिक-आर्थिक इत्यादी सर्वांगी अभ्यास केला पाहिजे, असे म्हणणारी ॲनल्स प्रणाली फ्रेंच इतिहासकारांनी प्रथम विकसित केली.
(३) प्राच्यवादी इतिहास लेखन
अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपातील अभ्यासकांमध्ये पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांच्याबद्दल कुतूहल निर्माण झाले होते. या कुतुहलापोटी भारतीय संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना प्राच्यवादी अभ्यासक असे म्हणतात. या अभ्यासकांनी भारतीय संस्कृती, इतिहास येथील विविध भाषा व धर्म यांचा अभ्यास करून इतिहास लेखन केले, या लेखनाला प्राच्यवादी इतिहास लेखन असे म्हणतात.
(४) राष्ट्रवादी इतिहास लेखन
एकोणिसाव्या शतकात भारतात इंग्रजी शिक्षण पद्धती सुरू झाली या पद्धतीत शिकून तयार झालेल्या इतिहासकारांना भारताच्या वैभवशाली प्राचीन इतिहासाविषयीची जाण आली. आत्मजाणीव निर्माण झालेल्या या इतिहासकारांनी भारताविषयी इतिहास लेखन केले त्या लेखनास राष्ट्रवादी इतिहास लेखन असे म्हणतात.
राष्ट्रवादी इतिहास लेखकांनी प्राच्यवादी लेखकांच्या पूर्वग्रहदूषित इतिहास लेखनाला विरोध केला. राष्ट्रवादी इतिहास लेखनामुळे ब्रिटिशांविरुद्ध स्वातंत्र्यलढ्यात प्रेरणा मिळाली ,तसेच प्रादेशिक इतिहास लिहिण्यालाही चालना मिळाली.
(५) वंचितांचा इतिहास
समाजाने त्यांना सर्व अधिकारापासून वंचित ठेवले उपेक्षित ठेवले अशा समूहांच्या इतिहासाला वंचितांचा इतिहास असे म्हणतात.
मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरेतून वंचितांचा इतिहास लिहिण्याची परंपरा सुरू झाली. भारतात महात्मा फुले व डॉक्टर आंबेडकर यांच्या लेखनात वंचितांच्या इतिहासाचा विचार दिसून येतो. लोकपरंपरा हे वंचिताच्या इतिहास लेखनाचे एक महत्त्वाचे साधन मानले जाते.
(६) उपयोजित इतिहास
एखादा विषय इतर क्षेत्रांमध्ये लागू करणे व त्यातून निघणारे निष्कर्ष प्राप्त करणे म्हणजे उपयोजन होय. इतिहासाची उद्दिष्टे इतर विषयांना लागू करून नवीन निष्कर्ष काढणे यालाच इतिहासाचे उपयोजन असे म्हणतात.
इतिहासाद्वारे भूतकाळातील घटना संबंधीचे जे ज्ञान प्राप्त होते त्याचा उपयोग वर्तमानात आणि भविष्यकाळात सर्व समाजाला कसा होईल याचा विचार उपयोजित इतिहासात केला जातो. इतिहासात सामाजिक, धार्मिक, कला, स्थापत्य इत्यादी घटक समाविष्ट असतात, तसेच या विषयांमध्ये ही इतिहासाचे उपयोजन होते.
(७) अभिलेखागार
ऐतिहासिक दस्तऐवज ज्या ठिकाणी जतन करून ठेवलेले असतात त्या ठिकाणास अभिलेखागार असे म्हणतात. अभिलेखागरांमध्ये महत्त्वाची जुनी कागदपत्रे, दप्तरे, जुने चित्रपट ,जागतिक करारांचे ऐवज इ. जतन करून ठेवले जाते.
अभिलेखागारामुळे मूळ कागदपत्रांचे संदर्भ मिळतात. तत्कालीन ऐतिहासिक घटनांचा अभ्यास करता येतो.
भारतात दिल्ली येथे हे राष्ट्रीय अभिलेखागार आहे. हे आशिया खंडातील सर्वात मोठे अभिलेखागार आहे.
(८) कला
आपल्याला आलेले अनुभव आणि त्यातून मिळालेले ज्ञान दुसऱ्यांना सांगावेसे वाटते .आपल्या मनातील भावना व्यक्त कराव्यात ही माणसाची सहज प्रवृत्ती असते. या सहज प्रवृत्तीतून जेव्हा एखादी सौंदर्यपूर्ण निर्मिती केली जाते ते तेव्हा तिला कला असे म्हणतात.
कला ही विविध घटकांची अनुभूती देणारी मांडणी असते. ही मांडणी शिल्प, गायन, चित्र नुत्य व वादन अशा विविध रूपात आविष्कृत होते. कलानिर्मितीच्या मुळाशी कल्पकता ,संवेदनशीलता, कौशल्य इत्यादी महत्त्वाचे घटक असतात.
(९) मराठा चित्रशैली
इसवी सनाच्या सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात मराठा चित्रशैली विकसित होण्यास सुरुवात झाली. सचित्र हस्तलिखित पोथ्या व त्यांच्या खाली आणि वर ठेवण्यात येणारी लाकडी फळ्यावरील चित्रे, काचचित्रे आणि भित्तीचित्रे या विविध स्वरूपात मराठा चित्रशैलीचा अविष्कार आढळतो.
या शैलीतील चित्रे रंगीत असून ती भित्तीचित्रे आणि हस्तलिखितामधील लघुचित्रे या स्वरूपातील आहेत. वाड्यांचे दर्शनी भाग, दिवाणखाने, मंदिराचे मंडप, शिखरे व छत यावर मराठा चित्रशैली तील भित्तिचित्रे पाहण्यास मिळतात,
(१०) हेमाडपंथी शैली
प्रामुख्याने यादव काळात महाराष्ट्रात हेमाडपंथी मंदिराची बांधणी झाली. हेमाडपंथी स्थापत्य शैलीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या पद्धतीत दोन दगडांमधील सांधे चूना व मातीने भरले जात नाहीत, दगडांमध्ये एकमेकात घट्ट बसतील अशा कातलेल्या खोबनी आणि कुसू यांच्या आधाराने भिंत उभारली जाते.
हेमाडपंथी मंदिराच्या बांधण्यात प्रामुख्याने तारकाकृती बांधकाम आढळते. तारककृती मंदिराच्या बाह्य भिंती अनेक कोनामध्ये विभागलेले असतात. या दगडी भिंती वरील देवतांची कोरीव शिल्पे पर्यटकांना आकर्षून घेतात.
प्रश्न थोडक्यात टिपा लिहा.
(१) वर्तमानपत्रांचे स्वातंत्र्य संग्रामातील कार्य
लोकजागृती, लोकशिक्षण, भारतीय संस्कृतीची व इतिहासाची थोरवी वर्णन केली .सामाजिक, धार्मिक व राजकीय चळवळीला पाठिंबा देऊन साम्राज्यवादी धोरणांना विरोध केला. पाश्चिमात्य विद्या व शिक्षण जनतेपर्यंत पोहोचून समाजप्रबोधनाचे काम केले. तत्कालीन सामाजिक आणि राजकीय प्रश्नांना वाचा फोडली. त्याचबरोबर समाज सुधारक नेते व संघटना यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवले.
(२) प्रसार माध्यमांची आवश्यकता
प्रसारमाध्यमांमुळे जग अधिक जवळ आले आहे कारण, त्यामुळे माहिती क्षणार्धात जगाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचते. माहितीचा मुक्त प्रवाह समाजात पोहोचवण्यासाठी प्रसारमाध्यमांची गरज आहे.
प्रसारमाध्यमामुळेच लोकांना घटना प्रत्यक्ष पाहायला मिळतात माहिती व अद्यावत ज्ञानाचा प्रसार होतो. प्रसारमाध्यमांद्वारे मनोरंजन होते. तसेच शैक्षणिक, व्यावसायिक प्रगतीसाठी आवश्यक असलेली माहिती ग्रामीण व दुर्गम भागापर्यंत पोहोचवली जाते. प्रसारमाध्यमांमुळे लोकशाही अधिक सुदृढ होण्यास मदत होते.
(३) प्रसार माध्यमांशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे
मुद्रित माध्यमे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे आणि नवमाध्यम या माध्यमांशी संबंधित अनेक व्यावसायिक क्षेत्रे प्रसारमाध्यमांशी संबंधित असतात. वृत्तपत्रात अग्रलेख विविध सदरे, लेख लिहिणारे लेखक, संपादक हवे असतात.
तसेच बातम्या जमा करणारे वार्ताहर, तंत्रज्ञ या सर्वांची गरज असते. इलेक्ट्रॉनिक माध्यमातही कलाकार, सादर करणारे, तंत्रज्ञ, निवेदक इत्यादींची गरज असते. या सर्व माध्यमातून सादर केले जाणारे लेख, कार्यक्रम, चर्चा इतिहासाशी संबंधित असल्यास इतिहास तज्ञांची ही गरज असते.
(४) मनोरंजनाची आवश्यकता
मनोरंजन हा मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे .म्हणूनच प्रत्येक मानवाला मनोरंजनाची आवश्यकता असते. व्यक्तीच्या निकोप वाढीसाठी निखळ मनोरंजन महत्त्वाचे असते .
चाकोरीबद्ध जगण्यातला कंटाळा दूर करून मनाला चैतन्य व उत्साह येण्यासाठी मनोरंजन आवश्यक असते. मनोरंजन मनाला उत्साह व कार्यशक्ती मिळवून देण्याचे काम करते .मनोरंजनातून छंद वाढीस लागतात व त्यातून व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो.
(५) मराठी रंगभूमी
व्यक्तीने किंवा समुदायाने ललित कला सादर करण्याचे स्थान म्हणजे रंगभूमी होय. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात मराठी रंगभूमीचा उदय झाला. विष्णुदास भावे हे मराठी रंगभूमीचे जनक होत.
सुरुवातीच्या काळात ऐतिहासिक पौराणिक नाटकाबरोबरच प्रहसने रंगभूमीवर आली. या नाटकांना लिखित संहिता नसे. थोरले माधवराव पेशवे या नाटकामुळे संपूर्ण लिखित संहिता असलेली नाट्यपरंपरा सुरू झाली. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस संगीत नाटकांची परंपरा सुरू झाली. सामाजिक प्रश्न आणि ऐतिहासिक विषय नाटकात हाताळले गेले. मराठी रंगभूमीच्या पडत्या काळात आचार्य अत्रे यांच्या नाटकांनी रंगभूमीला सावरले. वि.वा शिरवाडकर ,विजय तेंडुलकर, वसंत कानेटकर अशा लेखकांनी मराठी रंगभूमीला समृद्ध केले.
(६) रंगभूमी व चित्रपट क्षेत्राशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे
रंगभूमी व चित्रपट क्षेत्रात संबंधित व्यावसायिक क्षेत्रे खालील प्रमाणे- रंगभूमीसाठी नेपथ्य, वेशभूषा, केशभूषा, रंगभूषा करणाऱ्या अनेक तज्ज्ञांची गरज असते. दिग्दर्शक, कलाकार, छाया व प्रकाशयोजना करणारे तंत्रज्ञ व सहाय्यक यांची गरज असते. लेखक त्यांचे सल्लागार, संगीत व भाषा यातील जाणकार या सर्वांची आवश्यकता असते. चित्रपटासाठीही ही या सर्वांचे आवश्यकता असते.
(७) खेळणी आणि उत्सव
उत्सव व खेळणी यांचा प्राचीन काळापासूनच घनिष्ठ संबंध आहे विविध संस्कृतीत आणि धर्मात उत्सव प्रसंगी विविध खेळण्यांनी सजावट केली जाते. लहान मुलांना खेळण्याचे वाटप केले जाते.
दीपावलीच्या उत्सवात महाराष्ट्रात मातीच्या किल्ल्यांवर शिवसैनिकांच्या प्रतिमा ठेवतात .ती खेळणीच असतात. गावोगावच्या जत्रा व उत्सव प्रसंगी बाजारात मोठ्या प्रमाणात खेळण्याची दुकाने लागतात. बैलपोळा, नागपंचमी अशा सणा प्रसंगी मातीचे बैल, गाडी, नागोबा अशी खेळणी तयार केली जातात. मुले या खेळण्यांशी खेळतात स्पर्धा लावतात.
(८) खेळ व चित्रपट
पूर्वीच्या चित्रपटांमधून नायक नायिका खेळ खेळत असल्याचे किंवा खेळाची दृश्य दाखवली जात असत. अलीकडच्या काळात खेळ आणि खेळाडूंचा जीवनपट दाखवणारे हिंदी-इंग्रजी चित्रपट निघाले आहेत. लगान, दंगल असे क्रिकेट, कुस्ती खेळाशी संबंधित चित्रपट निघाले आहेत.
मेरी कोम, फोगट भगिनी या खेळाडूंच्या जीवनावर चित्रपट निघाले आहेत. प्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंग, भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी यांच्या कारकीर्दीवर ही चित्रपट निघाले. एकूण खेळ व चित्रपट यांचा संबंध मुखवटा पासून आज पर्यंत घनिष्ठ राहिलेला आहे.
(९) पर्यटनाची परंपरा
अन्नाच्या शोधासाठी आणि सुरक्षेसाठी अश्मयुगातील माणूस सतत भ्रमंती करीत होता. पण हे त्याचे पर्यटन नव्हते नवाश्मयुगानंतर काही उद्देशाने माणूस पर्यटन करू लागला. भारताला पर्यटनाची परंपरा प्राचीन काळापासून लागली आहे. तीर्थयात्रा करणे, परिसरातील जत्रा यात्रामध्ये भाग घेण्यासाठी जाणे हे धार्मिक पर्यटन होते.
व्यापारासाठी दूरवर प्रवास केला जाई, विद्याभ्यासासाठी दूरच्या प्रदेशात जाणे असेही पर्यटन होत असे नालंदा, तक्षशिला अशा विद्यापीठात शिकण्यासाठी बाहेरील देशातील विद्यार्थी येत असत. मानवाला फिरण्याची उपजतच आवड असल्याने प्राचीन काळापासून पर्यटनाला मोठी परंपरा लाभली आहे.
(१०) मार्कोपोलो
मार्कोपोलो या जग प्रवाशाचा जन्म इसवी सन १२५४ मध्ये इटलीतील व्हेनिस या शहरात एका व्यापारी कुटुंबात झाला. तेराव्या शतकाच्या अखेरीस रेशीम मार्गावरून चीन पर्यंत प्रवास करणारा तो पहिला युरोपियन होय.
त्याने लिहिलेले प्रवासवर्णन हा पश्चिम आशियाची माहिती देणारा संदर्भग्रंथ ठरला. आशियातील समाजजीवन, संस्कृतीक जीवन, निसर्ग आणि व्यापार यांची ओळख त्याने आपल्या ग्रंथातून जगाला करून दिली. यातूनच युरोप व आशिया यांच्यात संवाद व व्यापार सुरू झाला.
(११) कृषी पर्यटन
शेती आणि शेतीशी संबंधित उपक्रम पाहण्यासाठी केलेला प्रवास म्हणजे कृषी पर्यटन होय. अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात कृषी संशोधने चालू आहेत, त्यासाठी भारतभर कृषी संशोधन केंद्रे आणि कृषी विद्यापीठे स्थापन झालेले आहेत.
कोणत्या पिकांना कोणती माती योग्य, तिचा दर्जा, गांडूळ शेती, शेततळी, फळबागा इत्यादी उपक्रम काही भागात घेतले जातात. सिक्कीम सारखे राज्य सेंद्रिय उत्पादन राज्य म्हणून घोषित झाले आहे.
पावसाचे प्रमाण कमी असूनही ही इस्त्रायल सारख्या देशाने शेतीच्या क्षेत्रात मोठी प्रगती केली. हे सर्व अभिनव प्रकल्प व उपक्रम तसेच शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माहितीसाठी शेतकरी, विद्यार्थी, शहरी लोक जात असतात परदेशी लोकही येतात, यामुळे आज कृषी पर्यटन झपाट्याने वाढत आहे.
(१२) स्थल कोश
भूप्रदेशाच्या आधारे इतिहास घडत असतो, म्हणून इतिहासाच्या अभ्यासासाठी भूगोलही ही महत्त्वाचा आहे. या ऐतिहासिक स्थळांच्या संदर्भात माहिती देणारे कोश लिहिले जातात .महानुभाव पंथाचे प्रवर्तक श्री चक्रधर स्वामी ज्या गावी गेले त्या त्या गावांची तपशीलवार नोंद स्थानपोथी या ग्रंथात त्या पंथातील मुनी व्यास यांनी केली आहे.
सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांनी प्राचीन भारतीय स्थळ कोशाची रचना केली. या कोशात वैदिक साहित्य, महाकाव्य, पाणिनीचे व्याकरण, कौटिलीय अर्थशास्त्र, बौद्ध व जैन साहित्य, चिनी ,फारशी ,ग्रीक साहित्य यातील भौगोलिक स्थळांची माहिती दिलेली आहे, स्थल कोशामुळे प्राचीन नगरांची नावे त्यांचा इतिहास कळतो.
(१३) विश्वकोश
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी 1960 साली महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना केली. मराठी भाषा व साहित्य यांच्या विकासासाठी मराठी विश्वकोश निर्मितीस चालना देणे हा त्यामागे उद्देश होता.
या मंडळाने तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची विश्वकोशाच्या प्रमुख संपादक पदी नेमणूक केली. विश्वकोशाचे आजपर्यंत वीस खंड प्रसिद्ध झाले आहेत. मराठी विश्वकोश हा सर्व विषय संग्राहक असून जगभरातील ज्ञान सार रूपाने त्यात आणलेले आहे. इतर विषयांप्रमाणेच इतिहास विषयाशी निगडित असणाऱ्या महत्त्वाच्या नोंदी देखील विश्वकोशात करण्यात आलेले आहेत.
(१४) संज्ञा कोश
कोणत्याही विषयाचा अभ्यास करताना अनेक शब्द असे येतात की त्यांचा नेमका अर्थ काय याबाबत गोंधळ उडतो. इतिहासातील वसाहतवाद व साम्राज्यवाद, उदारमतवाद व जागतिकीकरण, साम्यवाद व समाजवाद अशा संज्ञांचा अर्थ सारखेच वाटायला लागतात.
वाचकांचा आणि अभ्यासकांचा असा संभ्रम होऊ नये म्हणून अशा संज्ञा वेगळ्या काढून त्यांचे अर्थ समजावून सांगणारे कोश तयार केले जातात त्यांना संज्ञा कोश असे म्हणतात संज्ञा कोषात विषयानुरूप महत्त्वाच्या संज्ञांचे एकत्रीकरण केले असते, संज्ञांचा अर्थ दिलेला असतो. त्या संज्ञा कशा निर्माण झाल्या याची माहिती दिलेली असते.
(१५) सरस्वती महाल ग्रंथालय
सोळाव्या सतराव्या शतकातील नायक राजांच्या काळात तमिळनाडूमधील तंजावर येथे हे सरस्वती महाल ग्रंथालय बांधले गेले. व्यंकोजीराजे भोसले यांनी १६७५ साली तंजावर जिंकल्यानंतर त्यांनी व त्यांच्या वंशजांनी ग्रंथालय अधिक समृद्ध केले.
या ग्रंथालयात सुमारे 49 हजार ग्रंथ आहेत, हे प्राचीन ग्रंथ हा इतिहासाचा फार मोठा ठेवा आहे. तत्कालीन महत्त्वाची कागदपत्रे, मोडी लिपीतील ग्रंथ, दस्तऐवज या ग्रंथालयात संग्रहित केलेले आहेत. प्राचीन इतिहासाची ती महत्त्वाची साधने आहेत. हे ग्रंथालय समृद्ध करण्यात सरफोजी राजे भोसले यांचे मोठे योगदान असल्याने 1918 मध्ये या ग्रंथालयाला त्यांचे नाव देण्यात आले.

धन्यवाद सर🙏 दीर्घोत्तरी प्रश्न send करा.
ReplyDeleteWrong
DeleteThanks sir
ReplyDeleteधन्यवाद!
ReplyDeleteThanks sir for giving us questions answered
ReplyDeletethank you
ReplyDeleteKay kamach nhi he
ReplyDeleteThanks sir
ReplyDeleteThank you sir 😃👍💯
ReplyDelete